गर्भधारणा व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे कायद्यानुसार गुन्हा

0
36

हेल्पलाईन क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन

नगर – गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य होताना आढळल्यास १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर यांनी केले आहे. तक्रारीची खातरजमा करुन न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यास शासनाच्या खबर्‍या बक्षीस योजनेंतर्गत माहिती देणार्‍यास एक लक्ष रुपयांपयरत बक्षिस देण्यात येईल, असेही कळविले आहे.