धार्मिक व तीर्थस्थळांना भेटी देऊन हरदिनचे स्वच्छता अभियान

0
20

नगर – आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्‍या हरदिन मॉनिरग ग्रुपच्या सदस्यांनी धार्मिक व तीर्थस्थळांना भेटी देऊन स्वच्छता अभियान राबविले. सहलीतून निरोगी आरो१/२यासाठी स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या सहलीत ज्येष्ठ नागरिकांसह हरदिन ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. हरदिनच्या सदस्यांनी वृद्धेश्वर, मच्छिंद्रनाथ (मायंबा), तारकेश्वर, भगवान गड, मोहटा देवी, एकनाथ मंदिर समाधी (पैठण) या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तर मंदिरासह परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रामनाथ गर्जे, सुमेश केदारे, मेजर दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, मच्छिंद्र बेरड, दिलीप गुगळे, विकास भिंगारदिवे, अशोक पराते, नामदेव जावळे, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, संपत बेरड, दिलीप बोंदर्डे, सरदारसिंग परदेशी, गोरक्षनाथ वामन, प्रफुल्ल मुळे, दिपक अमृत, सिताराम परदेशी, अविनाश जाधव, जालिंदर अळकुटे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, नवनाथ वेताळ, भगवान पालवे, राजू शेख, कुमार धतुरे, तुषार धाडगे, दशरथ मुंडे, किरण फुलारी, योगेश चौधरी, महेश सरोदे आदी सहभागी झाले होते.

संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉनिरग ग्रुप आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ सातत्याने चालवत आहे. आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार आहे. प्रत्येकाचे जीवन आरोग्यमयी होण्यासाठी सवारनी या मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे. हरदिनची सहल फे विरंगुळा पुरती मर्यादीत न राहता सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.