जिव्हाळा ग्रुपचा मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकु कार्यक्रम उत्साहात

0
15

दिक्षार्थी प्रतिक्षा भंडारी यांचा विशेष सत्कार

नगर – गप्पागोष्टी, धमाल मस्ती, आपुलकीचा संवाद, हसत खेळत विविध गेम्स खेळण्याचा आनंद, बक्षिसांची पर्वणी अशा मंत्रमुग्ध करणार्‍या वातावरणात जिव्हाळा ग्रुपचा मकर संक्रांतीचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हॉटेल कॅसल येथे झालेल्या कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक पध्दतीने संक्रांत साजरी केली. याच कार्यक्रमात संयमी जीवनाची दिक्षा घेणार्‍या दिक्षार्थी प्रतिक्षा सुशिल भंडारी यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जैन कॉन्फरन्सचे प्रमुख राष्ट ्रीय मार्गदर्शक अशोक (बाबूशेठ) बोरा, उद्योजक राजेश भंडारी, विजया भंडारी, मिनाताई मुनोत, संजस गुंदेचा, ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा, सेक्रेटरी सविता काळे, निलेश काळे, पारस कासवा तसेच दिक्षार्थीचे आई वडील यांच्यासह महिला उपस्थित होत्या. यावेळी लकी ड्रो काढून विजेत्यांना चांदीची नाणी भेट देण्यात आली.

अल्पना कासवा यांनी सांगितले की, जिव्हाळा ग्रुप नावाप्रमाणे एकमेकी ंना जीव लावणारा आहे. प्रत्येकीचे या ग्रुपशी आपुलकीचे नाते तयार झाले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील महिला यात सहभागी आहेत. दरवर्षी मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकु कार्यक्रमाने जिव्हाळा ग्रुपच्या वर्षाची सांगता होते तर महिला दिनी नवीन वर्षातील उपक्रम, कार्यक्रमांची सुरुवात होते. महिलांना एकत्र आणून त्यांना आपापसातील संवादाची संधी देणे तसेच नवनवीन माहिती, ज्ञान प्राप्त करून घेणे या उद्देशाने विविध कार्यक्रम घेतले जातात. विविध सण उत्सव एकत्रित साजरे करून एकोपा वृध्दींगत होतो. नवीन वर्षात गु्रपची सदस्य नोंदणी सुरु झाली असून इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा व जिव्हाळा ग्रुपशी नाते जुळवावे असे आवाहन त्यांनी केले. नोंदणीसाठी संपर्क : ८७८८५७२२८४/९९६००७३७७७.