हिंद सेवा मंडळाचा भूखंड सोडण्याचा निर्णय कायदेशीर व संस्थेच्या हितातच

0
35

चुकीचे आरोप करणाऱ्या सभासद नसलेल्या व्येी वर कायदेशीर कारवाई करणार : ॲड. अनंत फडणीस

नगर – हिंद सेवा मंडळ या शैक्षणिक संस्थेने स्थापनेचे शतक पूर्ण केले आहे. संस्थेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक व काटकसरीने होत आहे. अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या शैक्षणीक संस्थेवर बाहेरच्या व्येी कडून होणारे खोटे आरोप आम्ही सहन करणार नाही. संस्थेस शैक्षणिक वापरासाठी तकिया ट्रस्टने भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंड सोडण्याचा निर्णय पूर्णपणे कायदेशीरच आहे. भूखंडाचा ताबा सोडण्याबाबतचा रीतसर प्रस्ताव मंडळाला प्राप्त झाला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी २१ जानेवारी रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत सादर केला जाईल. सभासदांच्या अंतिम निर्णयानंतरच हा प्रस्ताव मान्य होणार आहे. या व्यवहारातून संस्थेला २५ कोटी रुपये किमतीचे बांधकाम करून मिळणार असल्याने भूखंड सोडण्याचा निर्णय कायदेशीर व संस्थेच्या हितातच आहे, असा खुलासा हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस यांनी करून किरण काळे सारखे संस्थेचे सभासद व संबंध नसलेल्या व्येी यामध्ये राजकारण आणत संस्थेची बदनामी करत खोटे आरोप करत आहेत. बाहेरच्या व्येी ंनी संस्थेची बदनामी करू नये. तसे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अ‍ॅड. फडणीस यांनी दिला आहे.

हिंद सेवा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी भूखंड प्रकरणाबाबत खुलासा करत हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस यांनी पत्रकार परिषदेत संस्थेची बाजू मांडली. यावेळी संस्थेचे संचालक उपस्थित होते. प्रकरणाची पार्श्वभूमी सांगताना सचिव संजय जोशी म्हणाले, हिंद सेवा मंडळाला नगर मनमाड रोडवर तकिया ट्रस्टने १९६४ साली शैक्षणीक कार्यासाठी सुमारे अडीच एकर जागा ९९ वर्षाच्या कराराने ५०० रुपये भाड्याने लीज ने दिली. १९८६ पासून ही जागा पडीक आहे. पुढे तकिया ट्रस्टने लुनिया मुनोत कंपनीशी साठेखत करून ती जागा विकली. मात्र जागेवर हिंद सेवा मंडळाचा ताबा असल्याने हे प्रकरण कोर्टात गेले. तेथे आमच्या बाजूने एकतर्फी निकाल लागण्याने मंडळाकडेच या जागेचा ताबा कायम राहिला. मात्र हिंद सेवा मंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने येथे शैक्षणीक कार्यासाठी कोणतेही बांधकाम आम्ही करू शकलो नाही. जागा पडीक असल्याने तेथील साहित्याची सतत चोरी होत असे. त्यामुळे या जागेच्या संरक्षणासाठी व तेथे झालेली अतिक्रमणे काढण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागले. दरम्यान डिसेंबर महिन्यात लुनिया मुनोत कंपनीतर्फे माजी आमदार अरुण जगताप व हर्शल भंडारी यांचा सदर जागेवरील ताबा सोडण्यासाठी संस्थेला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. ताबा सोडण्याचा निर्णय रीतसर कायदेशीर नोटीस देवूनच संस्थेने घेतला आहे.

हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असून २८ पैकी २२ संचालकांची यास मंजुरी आहे. व्यवहाराच्या सुरवातीच्या अनेक बैठका हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा यांच्या घरी अरुण जगताप यांच्या बरोबर झाल्या. मात्र आता ब्रिजलाल सारडा या व्यवहाराला का विरोध करत आहेत हे माहिती नाही. या व्यवहारात जगतापांचे नाव पुढे आल्याने काहींनी व्यिेगत विरोध सुरु केला आहे. संस्थेच्या कामात इतरांनी हस्तक्षेप करू नये. हा व्यवहार पूर्णपणे पारदर्शीपणे होणार आहे. अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक म्हणाले, हिंद सेवा मंडळ कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. भूखंड व्यवहारास सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळावी म्हणून हिंद सेवा मंडळाचा कोणताही पदाधिकारी किंवा संचालक सभासदांवर दबाव टाकत नाही. संस्थेचे सभासद हे सर्व क्षेत्रातील चाणाक्ष आहेत. संस्थेच्या हिताच्या निर्णयास ते न क्कीच साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्ये केला. या पत्रकार परिषदेस हिंद सेवा मंडळाचे संचालक सुमतिलाल कोठारी, मार्गदर्शक अजित बोरा, प्रा.ज्योती कुलकर्णी, रणजीत श्रीगोड, सुरेश चव्हाण, डॉ.पारस कोठारी, शरद गोखले यांच्या सह शिक्षक प्रतिनिधी विठ्ठल उरमूडे, कल्याण लकडे, गिरीश पाखरे, सुनील सुसरे, सहाय्यक सचिव बी. यू. कुलकर्णी आदी उपस्थित होते.