महापालिका सावेडी प्रभाग कार्यालयास भेट देत आयुक्तांनी केली ‘कर्मचारी वर्कशीट’ची पाहणी

0
54

कार्यालयातील अस्वच्छतेबाबत डॉ. पंकज जावळे यांनी केली कानउघडणी

नगर – महानगरपालिकेच्या सावेडी प्रभाग कार्यालयाला आयुे डॉ. पंकज जावळे यांनी अचानक भेट देऊन कर्मचार्‍यांच्या वर्कशीटची तपासणी केली, त्याचबरोबर सर्व कर्मचार्‍यांची हजेरी घेतली. प्रभाग अधिकारी उमाप यांच्याकडून कामचुकार कर्मचार्‍यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्वच कर्मचार्‍यांचे वर्कशीट तपासणी मोहीम सुरू करावी असे आदेश आस्थापन विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना दिले. ज्या नागरिकांची कर वसुली झाली नाही त्यावर जप्ती केली असणार्‍या मालमत्तेवर बोजा चढून निलाव प्रक्रिया राबवावी तसेच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्याचे साहित्य वाळू, वीट, खडी रस्त्यावर टाकली जात आहे, अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कामकाजात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुे डॉ. पंकज जावळे यांनी दिला. डॉ. पंकज जावळे यांनी सावेडी प्रभाग कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी आस्थापन विभाग प्रमुख मेहर लहारे उपस्थित होते.

साहित्य रस्त्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई

 

डॉ. पंकज जावळे यांनी सावेडी प्रभाग कार्यालयाला अचानकपणे भेट दिली, यावेळी अस्वच्छतेचे प्रदर्शन पाहावयास मिळाले. यावेळी आयुे जावळे यांनी नाराजी व्ये करीत कर्मचार्‍यांना कार्यालयामध्ये सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर सावेडी प्रभागातील सर्व कर्मचार्‍यांनी सकाळी सात वाजल्यापासून स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन मनपाचे सावेडी प्रभाग कार्यालय चकाचक केले. मनपा आयुे डॉ. पंकज जावळे यांनी सावेडी प्रभाग कार्यालयाची पाहणी करून स्वच्छतेबाबत नाराजी व्ये केली. त्यांच्या सूचनेनुसार आज प्रभाग कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी स्वच्छता मोहीम राबवली. लवकरच कार्यालय परिसरात रंगरंगोटी केली जाणार आहे तसेच गुटखा खाऊन थुंकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच प्रभाग कार्यालय हद्दीमध्ये बांधकाम करीत असताना रस्त्यावर साहित्य टाकल्यास मालकावर दंडात्मक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती प्रभाग कार्यालयीन प्रमुख संजय उमाप यांनी दिली.