पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा निषेधार्थ जिल्हा परिषदेत तोडफोड

0
18

अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले असून या घोसपुरी योजने अंतर्गत 15 गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ७ नवीन टाक्यांचे व मोठ्या प्रमाणात नवीन पाईपलाईनचे काम चालु केले आहे. मागील आठवड्यात जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत घोसपुरी योजनेत समाविष्ट असणाऱ्या बाबुर्डी घुमट येथील पाईपलाईन पुन्हा खोदून काढली (ट्रायल पीट)असता त्या ठिकाणी केवळ एक ते दीड फूट एवढीच पाईपलाईन जमिनीत गाडली असल्याचे आढळले. शासकिय नियमानुसार पाईपलाईन ही,जमिन मुरमाड खडकाळ किंवा काळी मातीची असली तरीही त्या पृष्ठभागापासून किमान 1.14 मीटर (फूट इंच ) एव्हडी खोल असावी.

शासननाने हे सर्व निकष लक्षात घेऊनच या योजनेसाठी तब्बल हजार कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. परंतु ठेकेदार हा पैसा वाचवण्याच्या हेतूने आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाईपलाईन फूट भर देखील जमिनीत गाडत नाही.पाईप वरवर असल्याने त्यावरून जड वाहतूक झालीनांगरट किंवा पाण्याच्या अती दाबाने काही महिन्यांतच ही सर्व पाईप लाईन फुटेल यात अजिबात शंका वाटत नाही.

हे काम खराब झालेले असताना देखीलस्वतः आपण आपल्या सहीनेठेकदारास जवळपास दहा टक्के बिल अदा केलेले आहे. संबंधीत या योजनेतील कुठलेही बिल कामाची शहानिषा केल्या शिवाय अदा करूनये तसेच स्वतः अधिकारी या सर्व (ट्रायल पीट) खड्डे चाचणी घ्यावी व खड्डे चाचणी येणाऱ्या आठ दिवसांत करावी या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले असून देखिल अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ आज जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय फोडण्यात आले आहे.