कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घसरण; पेट्रोल-डिझेल दर कमी होण्याची शक्यता

0
20

नवी दिल्ली – कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली विक्रमी घसरण पाहता पेट्रोल आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होण्याची शयता आहे. फेब्रुवारीमध्ये ही कपात केली जाऊ शकते. एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमती १२ टक्के कमी झाल्या आहेत, परंतु तेल विपणन कंपन्यांनी या काळात किंमती कमी केल्या नाहीत.

तेल विपणन कंपन्यांनी एप्रिल २०२२ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये शेवटची कपात केली होती. सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोल १०० रुपयांच्या वर, तर डिझेल ९० रुपयांच्या वर आहे. या कंपन्या सध्या प्रतिलिटर १० रुपये कमावत आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आतापयरत इंडियन ऑइल, भारत पेट्रोललियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट ्रोलियम कॉर्पोरेशनच्या नफ्यात सुमारे ५ पटींनी वाढ झाली आहे.