ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांसाठी त्रुटीपुर्तता कॅम्प

0
74

नगर – नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव जागेवर निवडुन आलेल्या उमेदवारांसाठी जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये त्रुटीपुर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामध्ये आरक्षित जागेवर मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीची पोहोच पावती देवून निवडणुक लढवून निवडुन आलेले आहेत. अशा मागासवर्गीय उमेदवारांनी समिती कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतू त्यांच्या प्रस्तावाची छाननी केली असता, त्यामध्ये प्रमाणित प्रती व जातीविषयक पुरावे सादर न केल्यामुळे प्रकरणे समिती कार्यालयात प्रलंबित आहेत.

या प्रकरणांवर मुदतीत निर्णय घेणे समितीवर कायदेशीर मर्यादा आहे. तेव्हा मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडुन आलेल्या सदस्य यांचेसाठी त्रुटीपूर्तता कॅम्प समिती कार्यालयात १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजित केलेला आहे. या संदर्भात अर्जदार यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटींची पुर्तता करावी असे आवाहन अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेले आहे.