भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी ‘भृंगऋषी’ ला ‘कपबशी’ तर श्री बेलेश्वर पॅनलला ‘नारळ’

0
29

दोन पॅनलमध्ये होणार सरळसरळ लढत; दोन अपक्षही रिंगणात

नगर – भिंगार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सत्ताधारी भृंगऋषी आणि विरोधी श्री बेलेश्वर पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत होत असून, दोन अपक्ष उमेदवारही या निवडणुकीत आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीसाठी भृंगऋषी पॅनलला ‘कपबशी’ तर श्री बेलेश्वर पॅनलला ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी २८ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापयरत म्हणजेच १५ जानेवारीपयरत ३० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, १५ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांना मंगळवारी (दि. १६) निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांनी सहाय्य केले. बँकेच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भृंगऋषी पॅनल आणि श्रीमती शारदाताई झोडगे व संदेश (पिंटूशेठ) झोडगे यांच्या नेतृत्वाखालील स्व. गोपाळराव झोडगे प्रणित श्री बेलेश्वर पॅनल यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारी उतरले असल्याने बँकेची ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीत भृंगऋषी पॅनलच्या उमेदवारांना ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले असून, त्यामध्ये सर्वसाधारण- मधून खरपुडे कैलासराव नारायणराव, गोंधळे माधव (बाळासाहेब) यशवंत, चौधरी किसनराव सखाराम, झोडगे महेश भाऊसाहेब, दळवी कैलास माधवराव, धाडगे अमोल दत्तात्रय, पतके राजेंद्र जगन्नाथ, फुलसौंदर विष्णु भानुदास, भंडारी रुपेश चंद्रकांत, रासकर कैलास रोहिदास. अनुसूचित जाती जमातीमधून जाधव एकनाथ रतन, महिला राखीवमधून करांडे तिलोत्तमा पोपटराव, भुजबळ अनिता राजेंद्र, इतर मागासवर्गीयमधून झोडगे अनिलराव मधुकरराव, विजाभज/विमाप्रमधून लंगोटे नामदेव सोनुजी.

श्री बेलेश्वर पॅनलच्या उमेदवारांना ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले असून, सर्वसाधारणमधून कडूस रमेश रंगनाथ, झोडगे संदेश (पिंटूशेठ) गोपाळराव, दळवी श्रीराम (बंटी) अशोक, धाडगे गणेश केशव, धाडगे विठ्ठल कोंडीराम, पानमळकर संदीप मल्हारी, फुलारी प्रकाश देवराम, रासकर अनिकेत विजय, शिंदे बापूसाहेब सखाराम, सय्यद मतीन खाजा, अनुसूचित जातीजमातीमधून छजलानी संजय बाबुराव, महिला राखीवमधून झोडगे शारदा गोपाळराव, शिंदे मुेाबाई बापूसाहेब, इतर मागासवर्गीयमधून झोडगे शुभम सतीश, विजाभज/विमाप्रमधून मुदळ सुखदेव शामराव. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले एकाडे दिपक दत्तात्रय (सर्वसाधारण) ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले असून, सपकाळ संजयकुमार (हरदिन) माधवराव (सर्वसाधारण) यांना ‘खुर्ची’ हे चिन्ह मिळाले आहे. सत्ताधारी भृंगऋषी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून १७ जानेवारी रोजी दुपारी ४ वा. भिंगार टेकडी येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास बँकेच्या सभासद, मतदार यांच्यासह सवारनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांनी केले आहे. श्री बेलेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ १७ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. नागेश्वर मंदिर, नागरदेवळे येथे नारळ वाढवून करण्यात येणार असून, सभासद, मतदार यांच्यासह सवारनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शारदा झोडगे व संदेश झोडगे यांनी केले आहे.