पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार : राणी लंके

0
92

शिवस्वराज्य यात्रेची नगर शहरात सांगता; १३ जेसीबींच्या सहाय्याने फुलांची उधळण

नगर – शिवस्वराज्य यात्रेला प्रत्येक तालुयातून प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांचे मूलभूत प्रश्न जाणून घेता आल्याने आगामी काळात आ. निलेश लंके यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्याचे काम करणार आहे. पक्षाने आदेश दिल्यास आ. निलेश लंके यांच्या निर्णयानुसार दोघांपैकी कोणीही लोकसभा लढविणारच असल्याचे सूतोवाच राणी लंके यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी आणि रुजवण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने आ. निलेश लंके यांच्या संकल्पनेतून पाथर्डी तालुयातील गडावरून यात्रेची सुरुवात करण्यात आली होती.

 

या यात्रेला प्रतिसाद मिळाला असून, जनतेचे मी आभार मानते, असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्या राणी लंके यांनी केले. नगर शहरात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होताच माळीवाडा परिसरात ढोल-ताशाच्या गजरात राणी लंके यांचे स्वागत करण्यात आले. कार्यकत्यारनी १३ जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण केली. ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतले. मिरवणुकीला महिला व कार्यकत्यारनी गर्दी केली होती.