तिघांच्या गँगला पोलिसांनी सावेडी उपनगरात पकडले; दोन कोयते केले जप्त
नगर – ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी सावेडी उपनगरात दारूच्या नशेत हातात कोयते घेवून दहशत निर्माण करत फिरणार्या तिघांना तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून २ कोयते व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकरी व अंमलदार मकर संक्रातीच्या दिवशी गस्त घालत असताना त्यांना या कोयता गँगबद्दल गोपनीय माहिती मिळाली. या पथकाने तातडीने सपकाळ चौकाकडे धाव घेत अमोल गोपीनाथ गायकवाड (वय २६, रा. गऊखेल ता.आष्टी, जि. बीड, हल्ली रा. तपोवन रोड, नगर), रोहीत रमेश औटे (वय २०,रा. पिंपरखेड ता. आष्टी, सध्या पोखर्डी ता. नगर), विकास सदाशिव दिवटे (रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, अहमदनगर) असे दारुच्या नशेत हातात कोयते घेवून फिरणार्या तिघांना पकडले.
त्यांच्याकडून दोन कोयते व एक मोपेड वाहन जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात आर्म अॅट कलम ४/२५ मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पो.हे.कॉ. दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, पो.ना. भानुदास खेडकर, संदिप धामणे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सुधीर खाडे, पो.कॉ. सतीष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सुमीत गवळी, सतीष भवर, बाळासाहेब भापसे यांनी केली.