नगर – शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी १८ जानेवारी रोजी अहम दनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्या बाबतचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट ्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिले आहे. महाराष्ट ्रातील शेतकरी वर्गावर अत्यंत बिकट प्रसंग आलेला आहे. एकीकडे शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, वायदे बंदी, बेसुमार आयाती करून शेतीमालाचे भाव पाडत आहे. परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुेी देण्या ऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमाफी देत आहे. शेतकर्यांच्या अनेक समस्या आहेत परंतू सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. शेतीसाठी वीज पुरवठा, पीक विमा, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान असे अनेक प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत. शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे म्हणून सेीची कर्जवसुली बंद करून शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुेी देण्यात यावी. शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा.
वन्य प्राण्यांकडून होणार्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. पीक विम्यात होणारी शेतकर्यांची फसवणूक बंद करून विम्याचा यो१/२य लाभ देणारी योजना आमलात आणावी या मागण्या आहेत. १८ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सकाळी ११ वाजले पासून ४ वाजेपयरत शेतकरी धरणे आंदोलन करतील. आंदोलन लोकशाही मार्गाने व शांततेत होईल. शेतकर्यांच्या वरील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे राज्यव्यापी धरणे आंदोलन असल्याचे घनवट यांनी म्हटले आहे. शेतकर्यांनी धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अनिल घनवट, स्व.भा.पक्षाचे जिल्हाध्यक्ष, निलेश शेडगे, शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मधुकर शिंदे, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके व सर्व तालुका अध्यक्षांनी केले आहे.