नगर शहरात चायना मांज्यामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी

0
62

नागरिकांनी चायना मांज्यापासून स्वत…चे रक्षण करावे : वैभव ढाकणे

नगर – मकर संक्रांत सणाच्या उत्साहामध्ये पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांज्याचा वापर झाला असून त्याचा दुष्परिणाम शहरातील अनेक नागरिकांना भोगावा लागला आहे. नायलॉन मांज्यामुळे शहरातील नागरिक जखमी झाले असून या मांज्यामुळे गळा कापणे, हात पाय डोके कापून गंभीर स्वरूपाच्या जखमा नागरिकांना झालेल्या पाहायला मिळत आहे. सरकारने बंदी घातली असताना देखील नगर शहरात सर्रास अनेक ठिकाणी मांज्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पक्षी, प्राणी, तसेच मनुष्याच्या जीवितास धोका निर्माण करणार्‍या चायना मांज्यावर प्रशासनाने हवी तशी कारवाई केलेली नाही म्हणूनच शहरात चायना मांज्याचा वापर केला गेला आणि परिणामी या घटना घडल्या आहेत.

 

चायना मांज्यामुळे शहरातील माळीवाडा परिसरात एका युवकाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे, तसेच नालेगाव येथील नागरिकाचा देखील चायना मांज्यामुळे गळा कापला असून, या नागरिकांवर सध्या उपचार सुरु आहे. मकर संक्रांत सणानिमित्त सध्या शहरात पतंग उडवणे सुरूच आहे. मात्र यात चायना मांज्याचा वापर होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगत दुचाकी किंवा पायी चालणार्‍या नागरिकांनी जागरूक राहत प्रवास करावा, संरक्षणाच्या दृष्टीने गळ्याभोवती मफलर किंवा जाड कापड गुंडाळावे, वाहन चालवताना हेल्मेटचा वापर आवश्य करावा आणि चायना मांज्यापासून स्वत…चे रक्षण करावे, तसेच तरुणांनी देखील पतंग उडवताना चायना मांज्याचा वापर टाळावा चार चाकी वाहनात प्रवास करत असताना सनरूफचा वापर टाळावा, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट ्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केले आहे.