मोक्कातील स्वप्निल शिंदेसह आठही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0
44

नगर – मो क्कामध्ये पोलिस कोठडीत असलेल्या भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठही आरोपींची गुरुवारी मो क्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले होते. राष्ट ्रवादी काँग्रेस कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणानंतर नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांवर मो क्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याचा तपास उपअधीक्षक खेडकर करीत आहेत.

त्यांनी सुरज ऊर्फ मिया राजन कांबळे, स्वप्नील रोहिदास शिंदे, महेश नारायण कुर्‍हे, अभिजित रमेश बुलाख, मिथुन सुनिल धोत्रे, अक्षय प्रल्हादराव हाके, राजू भास्कर फुलारी, अरुण अशोक पवार या आरोपींना ताब्यात घेऊन मो क्का न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ११ जानेवारीपयरत पोलिस कोठडी सुनावली होती. काल मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले व अ‍ॅड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.