पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अडविले; प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन
नगर – शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विद्याथ्यारना ग्रामीण भागातून शहरात यावे लागते. परंतु एस.टी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे या विद्याथ्यारची हेळसांड होत आहे. सततच्या त्रासाला कंटाळलेल्या या विद्याथ्यारच्या संतापाचा गुरुवारी (दि.११) सकाळी उद्रेक झाला आणि विद्याथ्यारनी नगर – मनमाड महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन करत एसटी महामंडळाच्या अनेक बसेस सुमारे तासभर अडवून ठेवल्या. शेवटी तेथून चाललेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विद्याथ्यारना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यावर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. नगर-मनमाड महामार्गावर देहरे (ता. नगर) येथे हे आंदोलन करण्यात आले. शाळा-महाविद्यालयीन विद्याथ्यारच्या सोयीसाठी नगर-देहरे ही बस सेवा यापूर्वी सुरु होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही बस अचानक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्याथ्यारना राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगावकडून नगरकडे येणार्या बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. या बसेसही या पासधारक विद्याथ्यारसाठी थांबत नाहीत. त्यामुळे विद्याथ्यारना वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. गुरुवारी (दि.११) सकाळी ६ वाजेपासून अनेक विद्यार्थी बस थांब्यावर उभे होते. सकाळी १० वाजत आले तरी एकही बस या विद्याथ्यारच्यासाठी थांबत नव्हती.
त्यामुळे विद्याथ्यारच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी अचानक महामार्गावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. विकास जाधव, तौफिक शेख, घनश्याम पिंपळे, सौरभ कुसळकर, सार्थक बंगे, रेहान शेख, आरजू खान, आफ्रीन शेख, युेा काळे, अमृता जेजुरकर यांच्या सह ७० ते ८० विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाले होते. ही माहिती मिळाल्यावर गावातील, ग्रा. पं. सदस्य किरण लांडगे, विकास जाधव, रविंद्र लांडगे, श्रीकांत लांडगे, महेश काळे, अजित काळे, मेघनाथ धनवटे निखील कपाले, संदीप लांडगे, प्रणाम काळे, वैभव काळे,पोलीस पाटील चंद्रकांत खजिनदार आदींसह ग्रामस्थही या आंदोलनात सहभागी झाले.
सुमारे तासाभरानंतर आंदोलन मागे
सुमारे तासभर या मार्गावरून जाणार्या सर्व एसटी बसेस या ठिकाणी अडविण्यात आल्या. सकाळी ११ च्या सुमारास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा नगरकडे जात असताना तेथे थांबला. मंत्री विखे यांनी विद्याथ्यारशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. काही विद्यार्थी प्रतिनिधींनी नगरमध्ये यावे, तेथे एसटी महामंडळाच्या अधिकार्यांना बोलावून घेवून तुमचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर विद्याथ्यारनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर नगरमध्ये मंत्री विखे यांची भेट घेत निवेदन दिले.
राज्य सरकार सवलती जाहीर करते पण अंमलबजावणीचे काय?
ग्रामीण भागातून शिक्षणाकरता दररोज विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने शहराकडे येत असतात. त्यांच्याकरता सरकारने सवलती जाहीर केलेल्या आहेत. मात्र एसटी महामंडळ प्रशासनाकडून सवारच्या सेवेकरता असलेल्या लाल परीच्या म्हणजेच एसटी बसच्या ब्रीद वायाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र सध्या आहे. वेळेवर बस न मिळाल्याने विद्याथ्यारना अनेक वेळा पर्याय मार्ग शाळेत जाण्याकरता शोधावा लागतो. जर सरकार एसटी प्रवासात विद्याथ्यारना सवलती जाहीर करते तर त्याची अंमलबजावणी महामंडळाकडून का केली जात नाही. विद्याथ्यारची अशी हेळसांड का केली जात आहे. असा सवाल काही संतप्त विद्याथ्यारनी उपस्थित केला आहे.