भिंगार अर्बन बँकेच्या निवडणुकीतील भृंगऋषी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ

0
47

शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आरती

नगर – भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या निवडणुकीतील भृंगऋषी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आरती करुन करण्यात आला. याप्रसंगी पॅनेलचे अनिलराव झोडगे, किसनराव चौधरी, राजेंद्र पतके, विष्णू फुलसौंदर, कैलासराव खरपुडे, अमोल धाडगे, कैलास दळवी, रुपेश भंडारी, माधव गोंधळे, कैलास रासकर, महेश झोडगे, एकनाथ जाधव, श्रीमती तिलोत्तम करांडे, अनिता भुजबळ, नामदेव लंगोटे आदिंसह देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, गजानन ससाणे, रंगनाथ फुलसौंदर, संजय चाफे, शामराव व्यवहारे, एकनाथ आंबेकर, कन्हैय्या बालानी, सुभाष चुडिवाल, गोरक्षनाथ कांबळे, अशोकराव कापरे, सुरेश खरपुडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी अनिलराव झोडगे म्हणाले, भिंगार बँकेला शतकोत्तर सेवेची परंपरा आहे. स्व.गोपाळराव झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३५ वषारपासून भिंगार अर्बन बँकेने पंचक्रोशितील गोरगरीब, छोटे-मोठे व्यापारी, शेतकरी, मध्यमवर्गीय लोकांची कामधेनू असलेल्या संस्थेची मनोभावे सेवा करत आहे.

नानांनी घालून दिलेल्या शिस्तीचा व पारदर्शकतेचा वारसा आजही पुढे नेण्याचा कसोटीने व चिकाटीने प्रयत्न आम्ही करत आहेत. आज ज्या पद्धतीने सहकार क्षेत्रात बदल होत आहे, त्या सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा बँक आर्थिक बाबतीत अतिशय सुस्थितीत ठेवण्यात आपल्या सवारच्या सहकार्याने यश आले आहे. यापुढेही बँकेची घोडदौड सुरु ठेवण्यासाठी भिंगार अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भृंगऋषी पॅनेलच्या माध्यमातून आम्ही सभासदापुढे जात आहोत. आमच्या कामाचे आणि बँकेच्या भरभराटीसाठी सभासदही आमच्या पाठिशी उभे राहतील, असा विश्वास भृंगऋषी पॅनेलचे प्रमुख अनिलराव झोडगे म्हणाले. याप्रसंगी किसनराव चौधरी म्हणाले, आज अनेक आर्थिक संस्था डबघाईला जात असतांना आपली भिंगार बँक मात्र अनुभवी संचालक मंडळ व कर्तव्यदक्ष कर्मचार्‍यांच्या परिश्रमाने व सभासदांच्या विश्वसाने घट्ट पाय रोवून उभी आहे.

आजही प्रगतीकडेच वाटचाल चालू आहे. बँकेने वेळोवेळी आधुनिकतेचा स्विकार करुन स्पर्धेच्या युगात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने बँकेच्या लौकिकात भर घालण्यासाठी आता निवडणुकीनिमित्त भृंगऋषी पॅनेलच्या माध्यमातून सभासदांपुढे लेखाजोखा घेऊन जात आहोत. सभासद आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून आमच्या पॅनेललाच भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास व्ये केला. याप्रसंगी माळीवाडा वेस येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन फेरीस शुभारंभ करण्यात आला. यानंतर परिसरातील मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यात आल्या.