संत किसनगिरीनगरमध्ये अक्षदा व निमंत्रण पत्रिकेचे पूजन

0
21

अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचा अभुतपुर्व सोहळा साजरा होणार : महंत भास्करगिरीजी महाराज

नगर – अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे. संपुर्ण भारतीयांचे स्वप्न ५५० वषारनी साकारले जात आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचा अभुतपुर्व सोहळा साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रत्येक गावोगावी, वाडी वस्तीवरील मंदिरात श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आनंदोत्सव उत्साहात साजरा करावा. प्रत्येक मंदिरात दिपोत्सव करण्यात यावा. तसेच घरोघरी दसरा व दिवाळी साजरी करावी.

प्रभू श्री रामा मंदिराच्या गर्भगृहात अभिमंत्रित केलेल्या अक्षदा व श्रीराम मंदिराचा फोटो निमंत्रण देण्यासाठी घरोघरी स्वयंसेवक येणार आहेत, असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे. पाईपलाईन रोडवरील संत किसनगिरी नगरमध्ये गुरुदत्त भेीधाम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या निमंत्रण अक्षता वर प्रभू श्रीराम मंदिराचा फोटो याचे पूजन देवगड देवस्थानचे महंत ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संत किसनगिरीबाबानगर भे मंडळाचे नामदेव महाराज, राजेन्द्र शेडोळे, दत्ता आसने, बाळू महाराज, सुनील नाळके, विजय गुंदेचा, रामदास दळवी, संजय नेव्हल, संदीप कुलथे, बाबासाहेब वरखडे, बाळासाहेब मोकाशी व शिवाजी गिरवले, संजय शिंदे उपस्थित होते.