सीए सभासद व सीए विद्यार्थी यांच्यासाठी १२ जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
68

सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे

नगर – सीए शाखा अहमदनगर व विद्यार्थी शाखा अहमदनगर यांच्या वतीने सर्व सीए सभासद व सीए विद्यार्थी यांच्यासाठी १२ ते १४ जानेवारी दरम्यान सीए यु. एस. कदम चार्टर्ड अकाउंटंटस प्रीमियर लीग (उअझङ) – २०२४ आयोजित केली आहे, अशी माहिती सीए शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी दिली. या स्पर्धेचे हे ७ वे वर्ष आहे. आयपीएल च्या धर्तीवर होणारी ही स्पर्धा नगर लबच्या मैदानावर सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात तीन दिवस चालणार आहे. यावेळी बोलतांना उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सनित मुथा यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही ही स्पर्धा आयपीएल च्या धर्तीवर आधी संघमालक निश्चित करतो व त्यानंतर खेळाडूंचा लिलाव करुन संघ अंतिम केले जातात. नंतर ८ संघांची २ गटात विभागणी करुन लीग पद्धतीने सामने खेळवले जातात.

विजेत्यास व उपविजेत्यास रोख पारितोषिक व ट्रॉफी दिली जाते. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ दी मॅच व मॅन ऑफ दी सिरीजसाठी पारितोषिक दिले जाते. ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले की, या स्पर्धेत नवनवीन संकल्पना राबवत असतो. त्याप्रमाणे यावर्षी ह्या स्पर्धेचे युट्यूब वरून लाइव प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच मैदानावर मोठी स्क्रीन लावली जाणार आहे. त्यावर फलंदाज व गोलंदाजांची मागील खेळेलेली आकडेवारी दाखवली जाणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सचिव प्रसाद पुराणिक, खजिनदार अभय कटारिया, सदस्य महेश तिवारी, माजी अध्यक्ष पवन दरक, मोहन बरमेचा, मिलिंद जांगडा इ. परिश्रम घेत आहेत. सर्व सीए सभासद व विद्यार्थी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावर येऊन आनंद घ्यावा असे आवाहन नगर सीए शाखेतर्फे करण्यात आले आहे.