आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर पुन्हा टिका केल्यास जशास तसे उत्तर देणार: प्रवीण गीते

0
46

नगर – नुकताच एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत विचारले की बाळासाहेब थोरात यांनी नगर साठी काय केले. अहमदनगर शहरामध्ये एमआयडीसीची स्थापना करण्यामध्ये थोरात यांचे योगदान होते व वाडिया पार्क क्रीडा संकुल स्थापन करण्यामध्ये तसेच अहदनगर जिल्हाधिकारी कार्यालय नूतन इमारत बांधण्यासाठी देखील त्यांचा मोठा वाटा होता. शहरातील अनेक गोष्टींमध्ये बाळासाहेब थोरात यांचा मंत्री असताना मोठा वाटा आहे. थोरात यांच्याकडे एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पाहिले जाते, त्यामुळे भविष्यात थोरात यांच्याविषयी चुकीचे वेव्य केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नगर शहरातील राजकीय परिस्थिती पाहता शहरांमध्ये दृश राजकारण पाहायला मिळत आहे काही राजकारणी शहरामध्ये आपली स्वत…ची पोळी भाजण्यासाठी बेताल वेव्य करत आहे. समाजामध्ये भांडण लावण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.

कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा एकेरी उल्लेख करणे किंवा त्याबद्दल अपशब्द बोलणे ही काँग्रेसची संस्कृती नाही तसेच नगर शहरामध्ये गुंडशाही व ताबे मारी विरुद्ध बोलणारे कथाकथित व्येी नगरमध्ये आता गुंडागर्दीची सुरुवात करताना पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाला धारेवर धरून कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरून वेव्य करत आहे, अशा व्येी ंची यो१/२य वेळी पोलीस स्टेशनला रवानगी करण्याची गरज असल्याचे युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांनी म्हटले आहे. राजकरणात मतभेद असावे मनभेद असू नये. परंतु आता नवीनच प्रथा पाहायला मिळते आहे, वैयिेक हेवेदाव्यातून शहरातील शांतता उद२ध्वस्त होऊ शकते. या वागण्यामुळे काँग्रेस विचारांचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत आहेत.

संबंधित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी स्वत…ची पोळी भाजून घेण्यासाठी नकारात्मक दृष्टिकोनातून काम करत असल्यामुळे असे अंतर्गत मतभेद निर्माण होतात. एखाद्याला काविळ झाली की सगळे पिवळे दिसते यांना तर जन्मत… काविळ झालेली आहे. येणार्‍या काळात आम्ही यांचे धंदे काय आहेत, हे उघड करु. संबंधित काँग्रेस पदाधिकार्‍यावर टीका करत प्रवीण गीते यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.