दुर्घटना टाळण्यासाठी ‘नायलॉनचा दोरा’ टाळा

0
37

शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे आवाहन; ‘आम्ही चायना मांजा वापरणार नाही’ अशी विध्यार्थ्यांनी घेतली शपथ

नगर – येथील हरियाली संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रतिबंधित नायलॉन (चायना) मांज्या विषयी प्रबोधनात्मक मोहिमेची सुरुवात रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली. या प्रसंगी बोलताना त्यांनी नायलॉन मांजाचे दुष्परिणाम व गंभीर स्वरूपाच्या दुर्घटना टाळण्यासाठी विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी नायलॉन दो- या ऐवजी उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायी दोर्‍याचा उपयोग करून संक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन कडुस यांनी केले. या वेळी विद्याथ्यारनां पतंग उडविताना प्रतिबंधीत नायलॉनचा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी दिली. विद्यालयाचे पर्यवेक्षक धनंजय मस्के यांनी नायलॉन मांजामुळे निर्माण होणारे दुष्परिणामाची माहिती देताना सांगीतले की शहरात, गावात नायलॉन मांज्यामुळे पक्षी अडकून त्यांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले असून त्यासोबतच नायलॉन मांजामुळे सायकलस्वार, दुचाकीस्वारांना गळा कापून दुखापत झाल्याने अपघाताचे प्रकारही घडले आहे. काही प्रकरणांमध्ये अपघातात जखमी होऊन अथवा गळा कापल्याने काही व्येी ंच्या मृत्यूच्याही घटनाही घडल्या आहेत.

त्यामुळे हरियाली संस्थेच्या वतीने शहरातील शाळांमध्ये अशाप्रकारे विद्याथ्यारना नायलॉन मांजा न वापरण्याबात प्रबोधन मोहीम राबविण्यात येत असल्याचे म्हस्के यांनी सांगीतले. या वेळी शपथही घेण्यात आली. नायलॉनच्या वापरामुळे अनेक पक्षी तसेच नागरिक जखमी होतात, काहींना आपला जीवही गमवावा लागतो. हे धोके टाळण्यासाठी विद्याथ्यारनी नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली तसेच इतरही कोणी असे करत असतील तर त्यांनाही यापासून परावृत्त करू तसेच वाहनांची वर्दळ असेल त्याठिकाणी आम्ही पतंग उडवणार नाही अशी शपथ घेतली. स्वागत प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक रंगनाथ सुंबे यांनी मानले. यावेळी उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, हरित सेनेचे मच्छींद्र जाधव, विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते.