जिल्ह्यात ३ वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणूक

0
92

 

नगर – नगर जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीच्या ३ वेगवेगळ्या घटना घडल्या असून यात तिघांची तब्बल ७५ लाख २५ हजार ७४२ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नगरच्या तोफखाना, नेवासा आणि पारनेर तालुयातील सुपा अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या २ दिवसांत ३ स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणुकीची पहिली घटना तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ट ्रक खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता हिंदूजा लेलँड फायनान्स कंपनीची २९ लाख ९९ हजार २४२ रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तारकपूर (नगर) शाखेतील अनिल रंगनाथ पाटील (वय ३९) यांनी मंगळवारी (दि.१९) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन परसराम डौले, परसराम किसन डौले (दोघे रा. जोगेश्वरी आखाडा ता. राहुरी), रमेश विठ्ठल वने (रा. वने वस्ती, शेटेवाडी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी), व्यवस्थापक यशवंत अ‍ॅटो प्रा.लि. व शाखाधिकारी चोलामंडलम२ इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड फायनान्स कंपनी लि. यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना २८ मार्च २०१९ रोजी घडली आहे.

हिंदूजा लेलँड फायनान्स लि. कंपनी, चेन्नई ही एक वित्तीय क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी असून तिच्या नगर शहरातील शाखेचे कार्यालय तारकपूर भागात आहे. कंपनीने नितीन परसराम डौले व परसराम किसन डौले यांना अशोल लेलँड कंपनीचा ट ्रक खरेदीसाठी २९ लाख ९९ हजार २४२ रूपयांचे कर्ज मंजूर केले होते. दरम्यान रमेश विठ्ठल वने याने हिंदूजा लेलंड फायनान्स कंपनीकडे ट ्रकवरील बोजाबाबत चौकशी न करता ती ट ्रक नितीन डौले याच्याकडून खरेदी केले. तसेच व्यवस्थापक, यशवंत अ‍ॅटो प्रा.लि. व शाखाधिकारी, चोलामंडलम२ इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड फायनान्स कंपनी यांनी संगनमत करून खोटी कागदपत्रे तयार करून दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे करीत आहेत. चौघांनी केली सव्वा ६ लाखांची फसवणूक फसवणुकीची दुसरी घटना नेवासा येथील कोर्टाजवळ घडली आहे. महिंद्रा कंपनीची पिक अप गाडी खरेदी करण्यासाठी नोटरी करिता खोटे आधार कार्डचा वापर करून ही ६ लाख २५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत प्रवीण हरिभाऊ अचपळे (रा.तिळापूर, ता.राहुरी) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नगर मधील नागरदेवळे येथील आरोपी प्रवीण पांडुरंग आतकर, आयुब रशीद सय्यद व इतर २ अनोळखी इसम या चौघांनी फिर्यादी अचपळे यांच्याकडून पिकअप गाडी खरेदी करण्यासाठी नोटरी करिता खोटे आधार कार्डचा वापर करारनामा केला, त्यांच्याकडून ६ लाख २५ हजार रुपये किमतीची पिक अप गाडी घेतली मात्र पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी चौघा जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंत्राटदाराला ३९ लाखांना फसवले पारनेर तालुयातील सुपा एमआयडीसीत विविध कंपन्यांचे काम घेणार्‍या कंत्राटदाराला ३९ लाखांना फसवल्याचे समोर आले आहे. याबाबत कंत्राटदार किशोर दिलीप लगड (रा.बाबुर्डी, ता. पारनेर) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अनुप पंढरीनाथ ढोरमले (रा. जातेगाव, ता.पारनेर) याने फिर्यादी याच्याशी बीएमआरएचएचव्हीएसी या कंपनी संदर्भात बनावट करारनामा करून ३९ लाख १ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे या फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून आरोपी अनुप ढोरमले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.