भिंगार अर्बन को-ऑप. बँकेची संचालक मंडळ निवडणूक जाहीर

0
54

२८ जानेवारीला होणार मतदान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

नगर – अहमदनगर जिल्ह्यासह राज्य कार्यक्षेत्र असलेल्या भिंगार अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २८ जानेवारी २०२४ रोजी मतदान होणार असून, २९ जानेवारी २०२४ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २१ ते २८ डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, २९ डिसेंबर रोजी दाखल उमेदवारी अजारची छाननी करणे, १ जानेवारी रोजी वैध उमेदवारी अजारची यादी प्रसिद्ध करणे, १ ते १५ जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेणे, १६ जानेवारी रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, २८ जानेवारी रोजी मतदान व २९ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाची एकूण १५ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यात सर्वसाधारण मतदार संघातून- १०, अनु. जाती जमाती- १, महिला राखीव- २, इतर मागासवर्गीय- १ आणि भटया विमुे जातीजमाती, विशेष मागास वर्ग मतदार संघातून १ जागा निवडली जाणार आहे.

भिंगार अर्बन बँकेची भिंगारमध्ये मुख्य शाखा असून, नगर शहरासह जिल्ह्यात आणि नाशिक, बीड, पुणे येथे मिळून एकूण ८ शाखा आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ६९८९ सभासद मतदार पात्र ठरले आहेत. या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अल्ताफ शेख हे काम पाहत आहेत. नगर शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने या बँकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.