कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासूनसंरक्षण अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी करा

0
69

 

१० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी संख्या असलेल्या आस्थापनांनीअंतर्गत तक्रार समिती गठित करावी

नगर – कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई, आणि निवारण) अधिनियम २०१३ व ९ डिसेंबर, २०१३ च्या नियम अधिनियमातील तरतूदीनुसार ज्या आस्थापनेमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असेल अशा प्रत्येक नियोत्याने आपल्या आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करावी, असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी स्थानिक तक्रारी समिती, नगर यांनी कळविले आहे. शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्र, इंन्टरप्रायजेस, सहकारी संस्था, क्रीडा संकुले, प्रेक्षकगृह, मॉल्स, अशासकीय संघटना, ट ्रस्ट रु१/२णालये, शुश्रूषालये, क्रीडा संस्था, वाणिज्य, शैक्षणिक, औद्योगिक आदी कार्यालयांमध्ये ज्या ठिकाणी १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी. या समि तीचे अध्यक्ष व सदस्यांचे नाव, पत्ता ई-मेल आयडी व मोबाईल नंबर तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नगर यांच्याकडे सादर करावे.

दरमहा बैठका नियमीत होत असल्याबाबतचा अहवालही वुलव.परसरीूरहेे.लेा मेल या ईमेलवर सादर करावा. ज्या कार्यालयामध्ये समिती गठीत केली नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या संबंधीत आस्थापना नियमानुसार कार्यवाहीस व दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असेही नमूद करण्यात आले आहे.