डोळ्यांच्या आरोग्यासाठी
अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांचे स्वास्थ्य चांगले राहते.
तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे. पालकाच्या सेवनाने
रक्तदाब नियंत्रणात राहतो. अंगावर गाठ येऊन सूज आली असेल, तर अशा वेळी पालकच्या
पानांचे पोटीस गरम करून त्या जागी बांधावे.