पालक भात

0
144

पालक भात


साहित्यः चार वाट्या बासमती तांदूळ, पालकाच्या दोन जुड्या, दोन वाट्या बारीक
चिरलेला कांदा, पंधरा-वीस लसूण पाकळ्या, पाव किलो पनीर, एक मोठा चमचा लिंबाचा
रस, एक चमचा तिखट, एक मोठा चमचा आल्याचा कीस, एक मोठा चमचा हिरव्या
मिरचीचा ठेचा, एक वाटी भिजलेले शेंगदाणे, चवीला मीठ, एक मोठा चमचा गरम मसाला,
अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी तूप, एक मोठा चमचा शहाजिरं.

तयारी : तांदूळ धूऊन ठेवावेत. पालक निवडून धुऊन बारीक चिरावा. पनीरचे तुकडे
करून त्यांना मीठ, तिखट लिंबाचा रस लावून ठेवावा.

कृती : तूप तापवून शहाजिरं घालावं आणि धुतलेले तांदूळ परतावे. सहा वाट्या
उकळतं पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून भात शिजवून घ्यावा. भात मोकळा करून
पसरावा आणि त्यावर गरम मसाला घालून भात कालवून घ्यावा. तेल तापवून त्यात
लसूण परतावा. आलं मिरची घालून परतावं. कांदा घालावा. कांदा परतून झाल्यावर पालक
घालावा. झाकण न ठेवता शिजवून घ्यावा. पनीरचे तुकडे मसाल्यासकट घालून भाजी
कोरडी झाली की त्यात भात घालून हलया हातानं ढवळून एक वाफ द्यावी