रक्तदाब वाढतोय?

0
54

रक्तदाब मोजताना वरच्या मापनात सातत्याने तीव्र स्वरूपाचे चढउतार होणं हे उच्च रक्तदाबाइतकंच घातक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे स्ट्रोक, हृदयविकार तसंच अकाली मृत्यूचा धोका वाढत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या अहवालानुसार रक्तदाबाचं वरचं मापन सर्वसाधारणपणे 120 असायला हवं. हे मापन 140 च्या पुढे जाणं उच्च रक्तदाबाचं द्योतक समजलं जातं. तपासणीत वरच्या मापनात सातत्याने 30 ते 40 ने चढउतार होत असणार्‍या रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. रक्तदाबावरून व्यक्तीच्या हृदयाच्या आरोग्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे डॉक्टर सतत रक्तदाब तपासण्याचा सल्ला देतात. रक्तदाबातला चढउतार घातक ठरू शकतो.