सीओपीडी: निदान, औषधोपचार

0
16

क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजिस’ म्हणजे ‘दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुस विकार.’ जगात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा हा अत्यंत घातक असा विकार मानला जातो. धूम्रपान करणार्‍यांना या विकाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे वेळीच धोका ओळखून उपचाराला सुरूवात करायला हवी. श्‍वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, सतत खोकला येणं ही सीओपीडीची प्राथमिक लक्षणं आहेत.

रोगनिदान : सीओपीडीचं योग्य निदान होण्यासाठी रुग्णांनी डॉक्टरांना स्वत:बाबतची आणि जीवनशैलीविषयीची सगळी माहिती द्यायला हवी. फुफ्फुसाची क्षमता तपासण्यासाठी ‘स्पायरोमेट्री’ ही तपासणी केली जाते. यावेळी रुग्णाला दीर्घ श्‍वास घेण्यास सांगितलं जातं. स्पायरोम ीटरला जोडलेल्या एका नळीत श्‍वास सोडायचा असतो. रुग्णाला छातीची क्ष- किरण चाचणी किंवा सीटी स्कॅन करण्यास सांगितलं जातं. रक्तातल्या ऑक्सिजनची तपासणी करण्यासाठीही चाचणी केली जाते. औषधोपचार : रोगाच्या तीव्रतेनुसार ‘ब्रॉंकोडायलेटर्स’, ‘ऑक्सिजन थेरपी’ तसंच शस्त्रक्रियेसारख्या उपचारांची निवड केली जाते. ब्रॉंकोडायलेटर्स इनहेलर किंवा स्प्रेच्या माध्यमातून दिले जातात. श्‍वसनमार्गाचा दाह कमी करण्यासाठी ‘ग्लोकोकॉर्टिकोस्टेरोइड्स’चा वापर केला जातो.