कणकेचे मोदक

0
62

साहित्य – एका नारळाचा किस, एक वाटी गुळ, एक चमचा खसखस भाजलेली, एक चमचा वेलदोडा पावडर, एक चमचा तेल, चिमुटभर मीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप, काजूचे तुकडे.

कृती – नारळाचा चव, गूळ एकत्र शिजवून घ्यावा. वेलदोडा पावडर व भाजलेली खसखस टाका. यात दोन मोठे चमचे साजूक तूप टाका. काजू बदाम टाका. कणकेत मीठ, तेल, टाकून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात लावून पातळ पुर्‍या लाटून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या. चाळणी किंवा मोदकपात्रात मोदक वाफून घ्या.