मूर्तीस चांदीचा मुकुट अर्पण करून आरती, विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, समाजोपयोगी कार्यक्रम
नगर – छत्रपती शिवाजीनगर, नगर-कल्याण रोड येथील श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिरच्यावतीने बालाजी उत्सवाचे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी श्री बालाजी व विठ्ठल-रुखमाई यांची नवग्रह मंदिर नालेगांव ते छत्रपती शिवाजीनगर शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप
यांच्याहस्ते मंदिरात आरती करून श्री बालाजी मूर्तीस चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. या आगोदर शोभायात्रेचा शुभारंभ माजी गटनेते संजय शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी गणेश कवडे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, सुरेश तिवारी, राम नळकांडे, संदिप दातरंगे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले कि कल्याण रोड परिसरातील श्री
बालाजी, विठ्ठल-रुखमाई मंदिराच्यावतीने दरवर्षी होणार्या विविध धार्मिक कार्यक्रमात
परिसरातील नागरिक उत्साहाने सहभागी होत असतात. या निमित्त राबविण्यात येणारे
उपक्रम हे सर्वांसाठी लाभदायक ठरत आहे. सामुदायिक विवाह हा चांगला उपक्रम
राबवत आहेत, असे सांगितले.
यावेळी शाम नळकांडे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी उत्सव व सर्वधर्मिय
विवाह आयोजन करण्यात आले असून, या उत्सवात विविध सामाजिक, धार्मिक,
सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी
रोजी श्री बालाजी व विठ्ठल-रुखमाई यांची शोभायात्रेने या उत्सवाची सुरुवात झाली
आहे. १५ फेब्रुवारी रोजी डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स, सोलो डान्स १६ फेब्रुवारी रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. याच दिवशी दुपारी १२. ३० वाजता सामुदायिक विवाह सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.यावेळी शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम नळकांडे म्हणाले, या उत्सवानिमित्त दररोज सकाळी ७ वा. श्री बालाजी, विठ्ठल-रुखमाई महाआरती व रुद्राभिषेक, दुपारी ४ ते ५.३० या वेळेत शिवाजीनगर महिला भजनी मंडळाचा हरिपाठ आदि कार्यक्रम होणार आहेत.या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शंभुराजे प्रतिष्ठान, शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ, नवग्रह प्रतिष्ठान, शाम नळकांडे मित्र मंडळ व कल्याण रोड व प्रभागातील सर्व नागरिक परिश्रम घेत आहेत