भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट

0
126

नगर – भारतीय जनता पार्टीचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन जिल्हाध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानून सत्कार केला . तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांचेही आभार मानले. यावेळी मंत्री गिरीश महाजन व शहर उपाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल मोहिते यांना शुभेच्छा देऊन पक्षाचे काम वाढवून पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या, असे सांगितले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, येणार्‍या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी सुरु करण्यास सांगून, अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कटीबद्ध व्हा, असा आदेश दिला. अनिल मोहिते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने मला जिल्हध्यक्षपदाची संधी देऊन दिलेली जबाबदारी मी सर्वाना बरोबर घेत काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून शहरात पक्षाची ताकद वाढवणार आह