नगर – न्यू आर्टस् कॉलेज महाविद्यालयातील बीबीए ( इंटरनॅशनल बिजनेस) हा तीन वर्षे पदवी अभ्यासक्रम राबवला जातो या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे व्यवस्थापन, आयात -निर्यात प्रक्रिया व त्यासाठी लागणारे दस्तऐवज शासकीय मान्यता लायसन्स, परकीय भाषा इत्यादींचा सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. जागतिकीकरणामुळे व्यापार्याला मोठी चालना मिळालेली आहे. त्यामुळे देशातील लोकांचे राहणीमान वाढलेले आहे प्रत्येक देश आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यातच परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (एफ.डी.,आय), जागतिक व्यापारी धोरण इत्यादी
गोष्टींचा समावेश होतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात कस्टम, उत्पादन शुल्क यासारख्या क्षेत्रात रोजगाराचा
फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकारच्या भारतातील सर्वात मोठे असलेले बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया
नवी मुंबई येथे बीबीए (आय.बी) च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीचे नियोजन करण्यात आले होते करण्यात आले होते, अशी
माहिती प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी सांगितले.
बी.बी.ए. विभागातील विद्यार्थी देशात नव्हे तर परदेशात उच्च स्तरावर चांगले काम करत आहेत. संस्थेच्या
आणि महाविद्यालयाच्या खंबीर पाठिंब्यामुळे बी.बी.ए. विभाग जोमाने प्रगती करत आहे. भविष्यात बी.बी. ए.,,(आय.बी) च्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाचा रोजगार मिळण्यासाठी विभाग प्रयत्न करणार आहे त्यासाठी भविष्यात जवाहर नेहरू पोर्टल ऑफ इंडिया, नवी मुंबई यांच्याशी सामंजस्य करार करण्याचा विभागाचा मानस आहे, असे बी.बी.ए विभागप्रमुख डॉ. मंगेश वाघमारे यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया, नवी मुंबई या औद्योगिक क्षेत्र भेटी दरम्यान प्रथम विद्यार्थ्यांना जेएनपीटी बाबत प्रेसेंटेशन देण्यात आले. यादरम्यान जेनपीटीचे संजय पाटील व प्रशांत नाखवा यांनी विद्यार्थ्यांना आयात- निर्यात याबाबत बंदरावर जाऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना
भविष्यात स्वतः करियर करण्यासाठी आवड निर्माण झाली.जे.एनपी.टी चे काही कामे आता खाजगी कंपनीकडे देण्यात
आलेले आहेत. विद्यार्थांनी या खाजगी कंपनीच्या संपर्कात रहावे असे आवाहन त्यांनी केले. सदर भेटीचे नियोजन डॉ.
सतीश जगताप आणि डॉ.राहुल थोरात यांनी केले होते. सदर भेटी दरम्यान विभागातील प्रा.अभिजीत सातभाई,
प्रा.नम्रता ठाकर व विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.





