तलवार घेवून फिरणार्‍याला बसस्थानक परिसरात पकडले

0
98

नगर – काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने धारदार तलवार शर्टाच्या पाठीमागे लपवून संशयित रित्या फिरणार्‍या तरुणास
कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडील धारदार तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई नगर पुणे रोडवरील स्वास्तिक चौकाजवळील पुणे बस स्टँडच्या बाजूला असलेल्या काटवनात २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

कोतवाली पोलीस शहरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की पुणे बस स्टँड परिसरात एक तरुण शर्टमध्ये पाठीमागील बाजूस धारदार शस्त्र लावून फिरत आहे. ही माहिती मिळताच पोलिस पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच तो पळू लागला असता त्यास तत्काळ झडप घालून पकडण्यात आले.त्याचे नाव सचिन चंद्रकांत काळे (वय २४, रा.सदाफुले वस्ती ता. जामखेड) असे असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पो. कॉ. सचिन लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन काळे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ /२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप
दराडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि योगिता कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस अंमलदार विशाल दळवी, संदीप पितळे, दशरथ थोरात, दिपक रोहकले, तानाजी पवार, अतुल कोतकर, शिरीष तरटे, सुरज कदम, संकेत धीवर,
सोमनाथ राऊत, राम हंडाळ आणि सचिन लोळगे यांनी केली आहे.