श्री समर्थ मंडळाचा आदर्श कुलोपाध्याय पुरस्कार अनंतराव चानसीकर व उमेश जोशी यांना प्रदान

0
135

समर्थ मंडळाचा आदर्श कुलोपाध्याय पुरस्कार २०२५ वे.शा.सं. अनंतराव चानसीकर व वे.शा.सं. उमेश जोशी यांना श्री समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नगर – ऋग्वेद भवन येथे समर्थ मंडळाचा आदर्श कुलोपाध्याय पुरस्कार २०२५ वे. शा. सं. अनंतराव चानसीकर व वे. शा. सं. उमेश जोशी (माजलगांवकर) यांना श्री समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, श्री समर्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागर, विजय धर्माधिकारी, सत्कारार्थी वे.शा. सं. अनंतराव चानसीकर व वे.शा.सं. उमेश जोशी (माजलगांवकर) आदी उपस्थित होते. श्री समर्थ मंडळाच्या वतीने समर्थभक्त मंदारबुवा रामदासी यांचा त्यांच्या कार्याबद्दल मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सुरेश अ. क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन यशवंत आंबेकर यांनी केले. पुरोहितांचा परिचय मिलिंद जोशी यांनी करून दिला. सौ. चानसीकर यांचा सत्कार सौ. सुरेखा कुलकर्णी यांनी केला. सौ. जोशी यांचा सत्कार सौ. प्रिया कुलकर्णी यांनी  केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समर्थ मंडळाचे सचिव महेश रा. कुलकर्णी यांनी करून दिला. मानपत्र वाचन सभासद कुलकर्णी ज्ञानेश यांनी केले. आभार महेश रा. कुलकर्णी यांनी मानले. श्रुतविंदा हिने पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी कार्यकारणी सदस्य उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, खजिनदार पुरुषोत्तम बेदरे, सुरेश टी. क्षीरसागर, रविंद्र कुलकर्णी, प्रदीप पतकी, संजय विप्रदास उपस्थित होते. कार्यक्रमास अरुणराव धर्माधिकारी, सचिन पारखी, अ‍ॅड. अच्युतराव पिंगळे, प्रद्युम्न जोशी, किशोर जोशी, सोमनाथ मुळे व धर्माधिकारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.