खासदार निलेश लंके; महिला सुरक्षा संदर्भात माळीवाडा व पुणे बसस्थानक परिसराची केली पाहणी
नगर – पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर एका युवतीवर एका नराधामाने बलात्कार केला. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला
लाजिरवाणी असून काळीमा फासणारी घटना आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही. एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव, गोरगरीब वर्ग लालपरीतून प्रवास करत असतो. मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून फॅन बसण्यासाठी बाकडे नाहीत,
कर्मचारी देखील सुरक्षित नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली असून याकडे सरकारला लक्ष
द्यायला वेळ नाही. माजी आरोग्यमंत्र्याचा मुलगा हरवला होता, त्याला एका तासात शोधून देण्याची तत्परता
सरकारने दाखवली. मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे अक्षरशा दुर्लक्ष असते. मी राज्य परिवहन
मंडळाकडे मागणी करणार आहे, की प्रत्येक एसटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व त्याचे कंट्रोल डेपोमध्ये ठेवा.
एसटीने प्रवास करणे देखील सुरक्षित राहिले नाही. माता, भगिनी व कॉलेजच्या मुलींची छेड-छाड होण्याचे प्रकार देखील
वाढले असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केले अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे
बसस्थानकमधील सुरक्षिततेची पाहणी खासदार निलेश लंके यांनी केली. यावेळी त्यांनी वाहक चालक व प्रवाशांशी संवाद साधला. जिल्हा परिषदमधील एका विभागातील अधिकार्याने एका महिलेला रात्री ११ वाजेपर्यंत
जिल्हा परिषदमध्ये बसून ठेवण्याचा प्रताप केला. ही निषेधार्थ गोष्ट आहे त्या अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी मी
केली आहे. अधिकारी व सत्ताधारी यांच्यामध्ये असलेले संबंधामुळे असले प्रकार घडत आहे, असे मत खासदार
निलेश लंके यांनी व्यक्त केले.