केशर गुलाब मंगल कार्यालयात महाशिवरात्री निमित्त द मिस्टीक आय या संस्थेतर्फे भजन संध्या व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नगर – महाशिवरात्री या पावन दिनी भगवान शिवाची
आराधना केली जाते. शिव आराधनेमध्ये ध्यानाला खूप महत्त्व
आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण आणि भजन केल्यास
भगवान शिव प्रसन्न होतात. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला जीवनात ताणय्तणाव जाणवतो. हा ताणतणाव दूर करण्यासाठी व मन शांती मिळविण्यासाठी ध्यान
धारण्याची आवश्यकता आहे. तसेच आपल्यामध्ये आलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट
करून सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी ध्यान धारणेचा चांगला फायदा मिळतो.
आज महाशिवरात्रीच्या पावनदिनी भजन संध्या कार्यक्रमातून भगवान शिवाची आराधना
करून भगवान शिवाशी एकरूप होऊन ध्यान साधनेतून सकारात्मक ऊर्जा प्राप्त
करून मनशांती मिळेल.
केशर गुलाब मंगल कार्यालयात महाशिवरात्री निमित्त द मिस्टीक आय या
संस्थेतर्फे भजन संध्या व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नटराज पूजन व दिपप्रज्वलन करुन भजन संध्या व ध्यान शिबिराचे
उद्घाटन प्रमुख अतिथी लालचंद मुनोत, सौ. सुकांता मुनोत,
आनंदराम मुनोत, सौ.कमल मुनोत, द मिस्टिक आय च्या संचालिका
साक्षी मुनोत आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भजन संध्येत शिवस्तुती, शिवतांडव, ऐ शिव भोले नाथ दिगंबर, ओम
नमः शिवाय हर हर भोले ओम नमः शिवाय, शिव शंभो महादेवा, हरहर गंगे या
भजनसंध्येच्या कार्यक्रमातून शिव आराधना करण्यात आली. यावेळी साधक भजनामध्ये
तल्लीन होऊन मंत्रमुग्ध झाले. भजन संध्येच्या कार्यक्रमात गायक सौ.गौरी सुद्रिक,
डॉ.वैष्णवी कुलकर्णी, शांभवी वळिंबे, राहुल ढोलरे, जीवन दुबे यांनी शिवस्तुती, शिव
तांडव, शिव भजने गायीली. तर यावेळी साथसंगत तबला वादक सुरज शिंदे, किबोर्ड
वादक प्रणव देशपांडे, रमेश कार्ले, गीटार वादक महेश कुलकर्णी व रुतीक देसाई यांनी
साथसंगत दिली. या कार्यक्रमाला अहिल्यानगरच्या नागरिकांनी प्रतिसाद दिला.