परसबाग निर्मिती स्पर्धेत मनपा ओंकारनगर शाळा अहिल्यानगरमधून प्रथम

0
153

 

नगर – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत महापालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर

केडगाव अहिल्यानगर शाळेला अहिल्यानगर शहरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. शहरातील १३५ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. शाळेला प्रथम क्रमांकाचे ७५०० रुपये पारितोषिक प्राप्त झाले आहे. मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे व शाळेतील विद्यार्थी यांच्या मदतीने गेल्या १० वर्षांपासून शाळेत परसबाग फुलवली आहे. यासाठी सहज फाउंडेशन अहिल्यानगर, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर मिडटाऊन, लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगर मिलेनियम यांचेही सहकार्य मिळाले आहे.

शाळेत शेवगा, कढीपत्ता, लिंबू, वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, भोपळा, विविध फळझाडे, विविध औषधी वनस्पती, विविध फुलझाडे यांची लागवड विद्यार्थ्यांच्या मदतीने करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध रोपांची व झाडांची माहिती प्रत्यक्षपणे मिळाली आहे. तसेच जल व्यवस्थापन, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, इको क्लब उपक्रम, पर्यावरणविषयक जागृती इत्यादी उपक्रम शाळेत राबविण्यात येतात. तसेच परसबागेतून मिळणाऱ्या भाज्या शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जातात.

तसेच विद्यार्थी शाळेतील विविध फळांचा आस्वाद घेतात.

ओंकारनगर शाळेला अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, शालेय पोषण आहार समन्वयक ज्ञानेश्वर कुटे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियंका लोळगे, उपाध्यक्षा दिपाली साळवे, सदस्य कवित वाघमारे, गणेश पाडळे, पल्लवी भुजबळ, दुर्गा घेवारे, पुनम बडे, भावना पवार, शिलाबाई देसाई, हेमंत झरेकर यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ओंकारनगर शाळेत मागील दहा वर्षांपासून शालेय परसबाग निर्माण करण्यात आलेली आहे. या परसबागेतील भाजीपाला शालेय पोषण आहारासाठी वापरला जातो. तसेच शाळेतील सिताफळ, पेरु, आंबा, रामफळ ही फळे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. शाळेतील भाजीपाला विद्यार्थी बाल आनंद मेळाव्यात विक्री करतात व खरेदी- विक्रीचा अनुभव घेतात. भाऊसाहेब कबाडी

– मुख्याध्यापक. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात. तसेच शाळा विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होते. शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत ओंकारनगर शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. जुबेर पठाण प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग अहिल्यानगर