पद्मश्री पोपटराव पवार यांचे प्रतिपादन नगर – शिर्डी रोडवरील विळद येथे काळेज् ऑर्किड रिसॉर्ट हे नगरच्या जिरायत भागात पर्यटन म्हणून पाहिले जाईल, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
ते नुकत्याच रिसॉर्टच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई काळे व त्यांच्या कन्या कु. सई व कु. राजनंदिनी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी सुजय विखे पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, शाहीर विजय तनपुरे, जि. प. सदस्य संदेश कार्ले, शिक्षक आप्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी पुढे बोलतांना पवार म्हणाले की, नगरकरांना आता महाबळेश्वर, लोणावळाखंडाळा येथे जाण्याची गरज राहणार नाही.
येथे त्या हिलस्टेशन सारखाच थंडगार फील येत आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले की, नाशिकच्या धर्तीवर बॅकवॉटरला जसे टुरिझम झाले आहे तसे विळदलाही पर्यटन वाढेल व त्यामुळे नगर शहरात पर्यटन वाढण्यास नक्की हातभार लागेल. काळे कुटुंबांनी केलेला पर्यटनवाढीसाठी केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमास अभय आगरकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते रिसॉर्टच्या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले. सौ. मनिषा बारस्कर-काळे यांनी आभार मानले