नगर – माजी आ. अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत देवीसमोर मनोभावे प्रार्थना केली. विनायकनगर येथील श्री वैष्णवी माता मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या भाविकतेने भरलेल्या सोहळ्यात सामूहिक महाआरती करून काकांच्या उत्तम आरोग्यासाठी
सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. वैष्णवी माते, अरुणकाकांना बरे कर अशा भक्तिपूर्ण भावनेतून त्यांच्या आरोग्याबद्दलची काळजी आणि आत्मियता ठळकपणे जाणवत होती. या कार्यक्रमाचे आयोजन स्थानीय नागरिक व मंदिर समितीच्या वतीने
करण्यात आले. यावेळी प्रशांत नन्नवरे, हर्षद वालेकर, धनंजय भोसले, चेतन अग्रवाल, आबा भोसले, नितीन
खैरे, गुड्डू म्हस्के, मयूर म्हस्के, सुमित सुगंधी, वेदांत दुशिंग, प्रसाद वाघमारे, किशोर श्रीश्रीमाळ, शुभम वालेकर, अंकित मोरे, दर्शन भंडारी, मनोज भंडारी, अभिजित कुर्हाडे, ऋषिकेश काळे, निखिल हजारे, ऋषिकेश रासकर, प्रतीक क्षीरसागर, शिवम गावडे, पद्माकर खेत्रे, सचिन रासकर, गणेश मोरे व अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळाच्या सदस्य, युवक, लहान मुलेही उपस्थित होती. प्रशांत नन्नवरे यांनी सांगितले की, काका यांनी अनेक वर्षे या परिसरातील लोकांसाठी काम करत आहे. आज आम्ही त्यांचं आरोग्य पूर्ववत व्हावं यासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली आहे. काका यांनी
नेहमीच श्री वैष्णवी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी पुढाकार घेत असून नवरात्र उत्सवामध्ये महाप्रसादाचे आयोजन करत असतात. अरुणकाका धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमीच अग्रेसर राहत असतात त्यांना श्री वैष्णवी माता नक्कीच या संकटातून बाहेर काढेल व समाजातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ऊर्जा देईल असे ते म्हणाले.