नगर – काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने धारदार
तलवार जवळ बाळगणार्या एकास तोफखाना पोलिसांनी मिस्किन
मळ्याजवळ ताब्यात घेऊन त्याच्याकडील धारदार तलवार जप्त
केली. ही कारवाई १७ मार्च रोजी केली.
तोफखाना पोलीसांना माहिती मिळाली की, नगर शहरातील
मिस्कीन मळ्यातुन निसार हॉस्पीटलकडे जाणार्या रोडलगत असलेल्या
काटेरी झाडाजवळ एक इसम गुन्हा करण्याच्या हेतुने गुलाबी रंगाच्या
कपड्यामध्ये तलवार घेऊन बसलेला आहे. पोलिसांनी तत्काळ
ठिकाणी सापळा लावुन बंटी प्रकाश शिंदे, (वय ३३, रा.तारकपुर,
ख्रिश्चन कॉलनी, अ.नगर) यास पकडले. त्याच्याकडे एक तलवार
आढळून आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस अंमलदार भानुदास खेडकर, अहमद इनामदार, वसिमखान
पठाण, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन यांनी केली आहे