नगर – शहरातील मध्यवस्तीत सरोष पेट्रोल पंप मागे असलेल्या सरोष कँटीन मध्ये १७ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली. आंतरराष्ट्रीय अवतार मेहेरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कँटीन मधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या. यावेळी मेहेरबाबा केंद्रातून सुरवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग अत्यंत भीषण असल्याने ती आटोक्यात येत नव्हती त्यानंतर अग्निशमन गाडी आली त्या गाडीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला
शेजारी पेट्रोल पंप आणि याठिकाणी आग वाढली असती तर शेजारी शेकडो घरांची वस्ती पेट्रोल पंपाला आग लागून मोठा स्फोट होउन आणखी मोठं नुकसान झालं असत आणि दुसरीकडे आग वाढत असताना अग्निशमन दलाची मोठी गाडी तातडीने दाखल होत असताना या सरोष कँटीन परिसरात मातीचे मोठं-मोठे ढिगारे आणि कचऱ्याचे ढीग टाकून येथे अतिक्रमण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे या गाडीला येण्यासाठी अडथळे आले मात्र पेट्रोल पंपाकडून गाडी आत आली आणि अर्धा तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले
सुद्यवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बंद पडलेली दीपाली टॉकीज आणि सरोष कँटीन परिसर याठिकाणी १०० ते १५० ट्रॅक्टर मातीचे ढिगारे टाकून जाणून बुजून रस्ते बंद करण्यात आले असून या जागेत किती प्रमाणात कचरा आणि मातीचे ढिगारे करण्यात आले असून नगर मनपाने तातडीने याठिकाणी स्वच्छता करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
आग लागली त्याच्या शेजारी मेहेर बाबा यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र असून याठिकाणी अमेरिका,जर्मनी,फ्रांस,इंग्लड,रशिया,इराण आणि जगभरातील मेहेरभक्त येत असतात अशा ठिकाणी आग लागून पुढील मोठा अनर्थ सध्या तरी टळला परंतु मनपा प्रशासनाने याठिकाणी तातडीने स्वछता करणे अत्यावश्यक आहे.