नगर – अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती झाली असून त्याला आरबीआयने देखील मान्यता दिले आहे. दिनेश लोखंडेंच्या प्रामाणिक कामामुळे तसेच बँकेबद्दल असलेले प्रेम पाहता ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करत आहे. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच बँकेला फायदा होईल. दिनेश लोखंडे यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत असल्याचे प्रतिपादन चेअरमन सी.ए गिरीश घैसास यांनी केले.]
मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करताना चेअरमन गिरीश घैसास, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, अशोक कानडे, संजय घुले, डॉ.विजयकुमार भंडारी, जयंत येलुलकर, डॉ.भुषण अनभुले, दत्तात्रय रासकोंडा, सेवक प्रतिनिधी. संतोष मखरे, वरिष्ठ अधिकारी प्रकाश वैरागर, संजय मुळे आदी उपस्थित होते.
दिनेश लोखंडे म्हणले की मी १९९७ साली अहमदनगर शहर सहकारी बँकेमध्ये लर्क या पदावर नोकरीला लागलो आहे. त्यानंतर २०१२ साली जुनिअर ऑफिसर २०२० साली सीनियर ऑफिसर आणि आता बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर संचालक मंडळांनी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहत बँकेला पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल बँकेत मी गेली २८ वर्ष प्रामाणिकपणे आणि सोचोटीने काम केले
असल्यामुळेच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले.