हिंद सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक डॉ.रमेश झरकर यांची बिनविरोध निवड झाल्यावर त्याचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व सचिव संजय जोशी. समवेत मावळते कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस, अजित बोरा, सुमतीलाल कोठारी व संचालक.
नगर – हिंद सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी कर्जत येथील ज्येष्ठ संचालक डॉ.रमेश झरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवड झाली. या निवडीबद्दल प्रा.मोडक व मानद सचिव संजय जोशी यांनी डॉ. झरकर यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी मावळते कार्याध्यक्ष अॅड. अनंत फडणीस, अजित बोरा, संचालक अशोक उपाध्ये, सुमतीलाल कोठारी,
अनंत देसाई, प्रा.मकरंद खेर, प्रा.ज्योती कुलकर्णी, जगदीश झालानी, डॉ.पारस कोठारी, दिलीप शहा, सहाय्यक सचिव
बी. यू. कुलकर्णी, सेवक प्रतिनिधी प्रा.गिरीश पाखरे, कल्याण लकडे, विठ्ठल उरमुडे, आदिनाथ जोशी, योगेश देशमुख
व कैलास बालटे आदी उपस्थित होते. अभिनंदनपर भाषणात प्रा.शिरीष मोडक म्हणाले, डॉ.रमेश झरकर हे
बर्याच वर्षांपासून हिंद सेवा मंडळाच्या कार्यात योगदान देत आहेत. संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे योगदान आहे.
त्यामुळे डॉ.झरकर हे हिंद सेवा मंडळाची शान आहे. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रात त्यांचे प्रभावी काम आहे.
सचिव संजय जोशी म्हणाले, अॅड. अनंत फडणीस यांच्या कारकीर्दीत संस्थेने मोठी प्रगती केली. ते जेव्हढे
कडक स्वभावाचे आहेत तेव्हढेच मृदुही आहेत. नूतन कार्याध्यक्ष डॉ.झरकर हे अनुभव संपन्न असल्याने ते अॅड.
फडणीस यांची परंपरा पुढे नेत संस्थेलाही प्रगतीपथावर नेतील. अॅड.अनंत फडणीस म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या सर्व संचालकांनी माझ्यावर दोन वर्ष कार्याध्यक्षपदाची मोठी जबाबदारी टाकली. या पदावरून काम करताना सर्वांचे मोठे सहकार्य लाभले. संस्थेचे व सारडा महाविद्यालयाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवता आले. सत्कारास उत्तर देताना डॉ.रमेश
झरकर म्हणाले, माझ्यावर नुकताच एक मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातून सावरण्यासाठी हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांनी मोठा धीर दिला. स्व.गोपीनाथ मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. पण ती संधी हुकली. तरीही दु:खी झालो नाही व पक्षाचे निष्ठेने काम करत राहिलो. तसेच हिंद सेवा मंडळाचेही अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष पद प्रथमच ग्रामीण भागाला मिळाले आहे. दिलेल्या संधीबद्दल आभार मानून हिंद सेवा मंडळाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी कटिबद्ध राहील याची ग्वाही देतो.