नगर – श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेत विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन, वैज्ञानिक प्रात्यक्षिके यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये
बर्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी शाळेचे सहशिक्षिका सौ. प्रिया मल्होत्रा, सौ. तंझीला शेख यांनी विज्ञान
दिन या विषयावर भाषणे दिली. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा ’विज्ञान दिन’ विषयावर भाषणे केली. प्रथमेश दहिफळे हा विद्यार्थी एलेन ह्युम तर प्रणाली दहिफळे हिने आईजैक न्यूटन होऊन गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि गतीचा सिद्धांत सांगितला. तसेच शाळेतील अगदी एलकेजी व युकेजीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वेगवेगळे विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन सादर केली. याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे यांनी या चिमूरड्यांचे व इतर विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शाबासकी दिली.
शाळेचे एज्युकेशन डायरेटर नंदकिशोर भावसार यांनीही मुलांचे कौतुक करून शाबासकी दिली. या विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन, वैज्ञानिक प्रात्यक्षिके याचे परिवेक्षण शाळेचे प्राचार्या सौ. तनुजा लोंढे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या
पार पाडण्यासाठी सौ. तलवार, सौ.महाजन, सौ. रुखया शेख, सौ. नारंग व इतर शिक्षक यांनी मिळून यशस्वीरित्या जागतिक विज्ञान दिन सोहळा पार पाडला.