नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये
आयोजित शिबिरात रक्तदान करताना विद्यार्थी.
नगर – स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त २५ फेब्रुवारी रोजी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले असून विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची भावना जागृत करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी केले. रक्तदान या विषयावर विद्यार्थ्यांशी बोलत असताना आपल्या
भाषणामध्ये हे देखील नमूद केले की, दिवसेंदिवस रक्ताची गरज वाढत असून, मोठ्या प्रमाणात रक्त
संकलित होणे ही काळाची गरज बनली आहे. रक्तदान चळवळ अधिक सक्षमपणे समाजामध्ये
रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांकडून चाललेले कार्य प्रेरणादाणी आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना
आणि अष्टविनायक रक्त संकलन केंद्र अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला अष्टविनायक रक्तपेढीचे डॉ. संदीप पाटोळे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हा
उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले त्यांना राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अक्षय देखणे
यांचे मार्गदर्शन लाभले. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना अष्टविनायक रक्तपेढी द्वारे प्रमाणपत्र
देण्यात आले.





