छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती आणि स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी
विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिवजयंतीच्या पारंपरिक मिरवणूकीत शिवजन्मोत्सवाचा देखावा साकारला
होता. यात पाळण्यात बाळ शिवबा आणि जिजाऊ आणि सहकार्यांच्या वेशभूषेत मुली होत्या. सोबतच
स्मारक समितीचे सचिव रिनुल नागवडे, जिजाबाई महिला बहुद्देशीय संस्थेच्या प्रा.नंदा पांडूळे, बांधकाम
व्यावसायिक धिरज कुमटकर, मयुर ढगे, कल्याणी कुमटकर, शिवतेज इलेट्रिकलच्या संचालिका
ऋतुजा जानवळे आणि स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल आदींनी या मिरवणुकीसाठी
परिश्रम घेतले होते. या शिवजन्मोत्सव देखावा मिरवणुकीत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती, हे या
देखाव्याचे वैशिष्ट्य होते. शहरभर याचे कौतुक केले गेल