शहरासह उपनगरांमधील नागरिकांची सुरक्षितता आली धोयात; बंदोबस्त वाढवा : नागरिकांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी
नगर – पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारी टोळी
अहिल्यानगर सह सावेडी उपनगरात देखील सक्रिय असल्याने गेल्या
आठवड्यात आनंदधाम रस्त्यावर एका उद्योजकाला लुटले. दुसर्या
दिवशी टिळक रोडवर मोपेड वर चाललेल्या महिलेचे गंठण हिसकावले.
या घटना ताज्या असतानाच पाईपलाईन रोडवरील सूर्यकांत फर्निचर
जवळ सायंकाळी ६वा.सुमारास श्रीकृष्णनगर मधील दीपक आंबेकर या
वृद्धाला रस्त्यात अडवून आम्ही पोलिस आहोत. तुमच्या गळ्यातील चैन
व अंगठी द्या असे म्हणत लुटले उपनगरातील नागरिकांची सुरक्षितता
धोयात आहे. तोफखाना पोलिसांनी चौका चौकात पहाटे व सायंकाळी
बंदोबस्त वाढवावा. अशी मागणी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी
केली आहे.
याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन
निवेदन देण्यात आले. यावेळी संपूर्ण घटनेची माहिती दिली. यावेळी फिर्यादी दीपक आंबेकर उपस्थित
होते.
अधिक माहिती देताना श्री. वारे म्हणाले, दीपक आंबेकर ही
नेहमीप्रमाणे वॉकिंगला सायंकाळी ६ वा. चालले होते. पाईपलाईन
रोडवरील सूर्यकांत फर्निचर जवळ दोन अनोळखी व्यक्तींनी आंबेकर
यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत तुमच्या गळ्यातील चैन व
अंगठी काढून द्या असे म्हटले यावर श्री. आंबेकर यांनी तुम्ही पोलिस
आहात तर माझ्या गळ्यातील सोने का मागता असा प्रश्न करताच
एकाने पाठीमागून धक्का देत त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची चैन
व ६ ग्रॅम वजनाची अंगठी काढून नेत काही वेळातच पोवारा केला.
आंबेकर यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत दोन्ही व्यक्ती पसार
झाल्या होत्या.
याप्रकरणी निखिल वारे यांनी चौका चौकात बसविलेल्या
सीसीटीव्ही कॅमेरा चा उपयोग का होत नाही असा प्रश्न केला. याबाबत
श्री.खैरे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक कोकरे यांना तातडीने या गुन्ह्याचा तपास करण्याचे
निर्देश दिले.