नववर्षाचे हे अनोखे स्वागत तरुणांना दिशा दर्शक : डॉ.सौ.सुधा कांकरिया
नगर – भारतीय संस्कृती ही जगात महान संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. थर्टीफस्टला घांगडधिंगाना घालून समाजात उपद्रव निर्माण करण्यापेक्षा काही विधायक कामे केली तर ती समाजासाठी व येणार्या पिढीसाठी आदर्शवत ठरतील. त्यामुळे युवकांनी अशाच विधायक कामात आपला वेळ घालविला पाहिजे. युवा शक्तीने आपली बुद्धमत्ता, ताकदीचा उपयोग हा देशाच्या विकासासाठी केला पाहिजे. सरत्या वर्षात नगर- मधील कलाकारांनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमातून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे बालिका वर्ष म्हणून साजरे करूया तसेच अहिल्यानगर कलाकारांसाठी उज्वल राहील. सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने नववर्षाचे हे अनोखे स्वागत तरुणांना दिशा दर्शक असे आहे, असे प्रतिपादन डॉ.सुधा कांकरिया यांनी केले. नववर्षाचे स्वागत प्रोफेसर कॉलनी चौक येथे सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने मध्यरात्री १२ वाजता नटराज पुजन करुन करण्यात आले. याप्रसंगी शिल्पकार प्रमोद कांबळे, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, पवन नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विराज मुनोत, तेजस अतितकर, संकेत होशिंग, अनंत जोशी, सदानंद भणगे, भूपेंद्र रासने, पूनम रासने, संदीप दंडवते, प्रशांत जठार, अॅड. सतीशचंद्र सुद्रिक, सुजाता पायमोडे, सरिता पटवर्धन, संदीप भुसे, सुधीर कुलकर्णी, अभय गोले, विनय मुनोत, गौरी सुद्रिक, बालकलाकार ध्वज मुनोत आदि उपस्थित होते. गौरी सुद्रिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित पोवाडा सादर केला. यावेळी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कलाकारांचा गौरव करण्यात आला. यामध्ये संजोग धोत्रे, अवनती गोले, सिद्धी कुलकर्णी, पवन नाईक, तसेच देखावा व रिकामिक एकांकिकांचे संघ, फुलपाखरू बालनाट्य संघ राजश्री भणगे आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी प्रमोद कांबळे, पवन नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.सुधा कांकरिया यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. सूत्रसंचालन तेजस अतितकर यांनी केले तर आभार विराज मुनोत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ऋषिकेश जोशी, आशुतोष मेनसे, क्षितिजा होशिंग, पुष्कर शुक्रे, मंगेश जोशी, सचिन तुपे, निखिल डफळ, रघुनाथ सातपुते आदींनी सहकार्य केले.