दैनिक पंचांग मंगळवार, दि. ३१ डिसेंबर २०२४

0
28

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
पू.षा. २४|०४, सूर्योदय ०६ वा. ३५ मि. सूर्यास्त ०६ वा. ०२ मि.

मेष : आज जास्त खर्च होईल. इतरांना सहकार्य केल्याने सामंजस्य
वाढेल.
वृषभ : एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. मागील
उधारी वसुल होईल.
मिथुन : संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. प्रवासाचे योग संभवतात.
जुने मित्र भेटतील.
कर्क : वाहने व उपकरणे जपून चालवा. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. घर
जागा संबंधी व्यवहार यशस्वी होतील
सिंह : आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. मागील उधारी व उसनवारी
वसूल होईल.
कन्या : प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शयता आहे.
व्यापार व्यवसाय चांगला राहिल.
तूळ ः तब्येत बिघडेल. आज आपल्या करीयरशी संबंधित सर्व
बाबी स्पष्ट होतील.
वृश्चिक : आर्थिक विषयांमध्ये नुकसान संभवते. पाकीट चोरीला जाईल. भाऊबंद डोके
वर काढतील.
धनु  : दिवस आनंदात जाईल मात्र मातृचिंता सतावेल. कुटुंबियांसमवेत सहलीला
जाल.
मकर : अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. संभाषणात प्रभाव
राहिल.
कुंभ : दिवस कालच्या इतका आनंदात जाणार नाही. कार्यालयीन कामकाजात त्रास
होईल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा