मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
42

घड्याळाचा शोध लावल्यावर कसे कळले नेमकी वेळ काय झाली आहे?

अगदीच सोपे आहे बघा. कल्पना करा की तुम्ही तुमच्या देशापासून खूप लांब अशा निर्जन
बेटावर अडकले आहात. तुमच्या जवळ घड्याळ तर आहे परंतु ते तुम्ही तुमच्या देशाच्या स्थानिक
वेळेवर लावलेले आहे, अर्थात त्या बेटाच्या भौगोलिक स्थितीच्या दृष्टीने ते घड्याळ भलत्याच
वेळा दाखवत असणार म्हणजे कदाचित तुमच्या घड्याळात १२ वाजलेले असतील व त्या बेटावर
नुकताच सुर्योदय होत असेल. मग तुम्हाला तुमचे घड्याळ त्या बेटाच्या वेळे प्रमाणे लावावे लागेल. मग
हे करायचे कसे?
अगदीच सोपे काम आहे. जेथे दिवसभर सुर्यप्रकाश पडत असेल असे मैदान शोधायचे. एक
सरळसोट दोन-तीन फूट लांबीची काडी मैदानावर जमिनीशी काटकोन करेल अशा रितीने खोचायची
(काडी जमिनीवर एक ते दीड फूट वर रहायला पाहिजे) त्या काडीची सावली पडेल, त्या सावलीच्या
टोकावर कशानेही खूण करावी. अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळाने सावली कुठपर्यंत पडते, ते पहात
खूणा करत घ्यायच्या. एक वेळ अशी येईल की सावली लहानातील लहान असेल व नंतर परत
तीची लांबी वाढत जाईल. ज्या वेळी सावलीची लांबी कमीत कमी असेल, ती वेळ म्हणजे त्या
ठिकाणी दुपारचे १२ वाजलेले असतील. त्या प्रमाणे तुमचे घड्याळ लावून घ्या म्हणजे तुम्हाला स्थानिक
वेळा अचूक समजतील.
याच तत्वावर प्राचीन काळची सुर्य घड्याळं निर्माण झाली. व ज्या कोणी पहिल्यांदा आजचे
यांत्रिकी घड्याळ बनवले असेल त्याने सुद्धा स्थानिक वेळेनुसार आपल्या घड्याळात वेळ सेट
केली असणार.
आज आपण भारतात, भारतीय प्रमाणवेळेनुसार व्यवहार करतो. ही प्रमाणवेळ रेखांश
वर प्रमाणीत केलेली आहे. या रेखांशच्या पुर्वेस अथवा पश्चिमेस असलेल्यांसाठी स्थानिक वेळ व
आय एस टी मध्ये फरक पडेल.