गाजराचे लोणचे
साहित्य : १ किलो गाजर, १ कप मोहरीचे तेल, १ चमचा तिखट, १/२ चमचा
हळद, १ चमचा आमसूल पावडर, चवीनुसार मीठ
कृती : सर्वात आधी गाजर स्वच्छ धुवून सोलून घ्यावे व उभ्या आकारात छोटे
छोटे त्याचे तुकडे करावे. आता मोहरीचे तेल तिखट, हळद, आमसूल पावडर, मीठ घालून
बारीक वाटून द्यावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे गरम तेलात गाजराचे
तुकडे घालून परतवून घ्यावे. आता हे तुकडे बनवलेल्या मिश्रणामध्ये चांगले मिस करावे.
तसेच गाजराचे हे मिश्रण एका डब्ब्यात भरावे व झाकण लावून ठेवावे कमीत कमी एक
आठवडा असेच ठेवावे ज्यामुळे ते चांगल्या प्रकारे मुरेल आणि त्याची चव चटपटीत
लागेल.